श्वेतांग निकळजेच्या मुसक्या आवळणाऱ्या युनिट-१ च्या पथकाला 15 हजारांचे बक्षिस

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठेतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर अनेक वेळा मुलीच्या भावाच्या फोनवर फोन करून कुटूंबियांना धमकी देत पुणे शहर पोलिसांना आव्हान देणार्‍या कुख्यात श्‍वेतांग निकाळजेला शहर गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने भोर येथुन अटक केली होती. काैशल्यपूर्वक तपास करुन शिताफिने निकाळजेच्या मुसक्या आवळणाऱ्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्‍वेतांग निकाळजे (रा. भीमनगर, मंगळवार पेठ) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूध्द आत्‍तापर्यंत 12 ते 15 गंभीर गुन्हयाची नोंद शहरातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात आले. त्यामध्ये दोन खून, दरोडा, दरोडयाची तयारी, अग्‍नीशस्त्रे बाळगणे आणि खंडणी उकळणे या सारख्या गंभीर गुन्हयांचा समावेश आहे. दि. 7 एप्रिल 2018 रोजी श्‍वेतांग निकाळजेने मंगळवार पेठेतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर त्याने वेळावेळी मुलीच्या भावाला फोन केला. मी तुझ्या बहिणीशी लग्‍न करणार आहे, तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली तर मी तुम्हाला संपवेल अशा प्रकारची धमकी त्याने दिली होती. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करताना संबंधित पोलिस अधिकार्‍याने योग्यरित्या फिर्याद दाखल करून घेतली नसल्याचा आरोप करीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अपहरण प्रकरणाचा तपास देखील योग्य रितीने होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहाय्यक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलिस कर्मचारी सचिन जाधव, गजानन सोनुने, सुधाकर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, रिजवान जिनेडी, तुषार खडके, तुषार धामणकर, मेहबुब मोकाशी आणि त्यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी कुख्यात श्‍वेतांग निकाळजेच्या भोर येथे मुसक्या आवळल्या होत्या.