‘या’ १५ वर्षाच्या मुलासोबत घडले असे काही, जाणून घेतल्यावर तुम्हालाही होईल दुःख  

बिलासपूर : वृत्तसंस्था : सिरगिट्टीच्या चुचुहियापारा येथील गणेश नगरमध्ये एका  १५ वर्षाच्या मुलासोबत असे काही घडले आहे की त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. हा मुलगा रात्री झोपला पण दुसऱ्या दिवशी उठलाच नाही. प्रेम नाग असे या मुलाचे नाव आहे. प्रेमच्या आईची तब्येत खराब झाली म्हणून त्याने आईच्या हाताची मालिश करून दिली. आई झोपल्यानंतर तो सुद्धा झोपला पण या नंतर तो कधीच उठला नाही. शेजारील लोकांनी त्याला रूग्णालयात भर्ती केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मालिश करताना आईला म्हणला आजचा होमवर्क पूर्ण झाला
प्रेम नाग ८ वीत शिकत होता. शुक्रवारी रात्री त्याने आई अंजली सोबत जेवण केले आणि अभ्यासाला बसला. रात्री अचानक आईची तब्येत खराब झाली म्हणून त्याने आईच्या हाताची मालीश केली. त्या दरम्यान त्याने आईला सांगितले की त्याचा होमवर्क पूर्ण झाला आहे. मालीश करताना आई झोपी गेली त्यानंतर तोही झोपला. त्यानंतर सकाळी आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही.
एकुलता एक होता प्रेम
प्रेम खुप साधा भोळा होता, तो कोणलाच कामाला नाही म्हणयचा नाही. त्याला क्रिकेटची आवड होती. त्यादिवशीपण तो क्रिकेट खेळून घरी आला होता. प्रेम आपली आई अंजलीला एकुलता एक होता. त्याच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोन मोठ्या बहिणींचे लग्न झाले होते. घरात प्रेम आणि त्याची आई दोघेच राहायचे.