देवगाव येथील 15 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग, आरोपीस 3 दिवसाची पोलिस कोठडी

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन –  देवगाव येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणारा रविंद्र अशोक चौधरी ( वय ३० रा.मानोरी) या इसमास लासलगाव पोलिसांनी फिर्याद दाखल होताच अटक केली असुन निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी त्यास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक २२ सप्टेंबर मंगळवारी दुपारी देवगाव येथे ही मुलगी घरी जात असतांना लोखंडी पुलाजवळ रविंद्र अशोक चौधरी हा सायकल वरून येत असताना अल्पवयीन मुलीस थांबविले तीने थांबण्यास नकार दिल्यावर आरोपीने तिला बळजबरीने रस्त्याच्या बाजुला नेऊन तिचेवर अतिप्रंसंग केल्याची घटना घडली. यावेळेस पीडित अल्पवयीन मुलगी ही बचावासाठी आरडाओरड केली म्हणून तिला या आरोपिने मारहाण करत अतिप्रसंग केला

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे व पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे यांच्यासह पोलिस पथकाने भादंवि कलम ३७६(३),३४१.३२३, ५०४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण कायदा सन २०१२ चे कलम ८/१२ प्रमाणे गुन्हा दाखल करून रविंद्र अशोक चौधरी ( वय ३० रा.मानोरी) यास अटक केली. आज पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे यांनी न्यायालयात हजर केले असता जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड .रामनाथ शिंदे यांनी युक्तिवाद केला .त्यानंतर न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली . याबाबत अधिक तपास लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे व पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like