स्वातंत्र्य हवं म्हणून १५ वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीने केला वडिलांचा खून

बंगळूरू : वृत्तसंस्था – प्रेमासाठी तरुण तरुणी कधी काय करतील याचा अंदाजही करता येत नाही. प्रेम मिळविण्यासाठी कोणी चोऱ्या करेल तर कोणी आत्महत्या तर कोणी खून. त्यात आता अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांमध्ये वाढच होताना दिसत आहे. अशीच एक घटना बंगळूरमध्ये घडली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी स्वातंत्र्य हवं असल्याने एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्याच वडिलांची धारदार हत्याराने हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलीसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलीस उपाआयुक्त एन. शशीकुमार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या मुलांचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. ते अनेकदा मॉलमध्ये भेटायचे. मुलीच्या वडिलांना तिच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांनी या सर्व गोष्टी बंद करुन अभ्यासात लक्ष द्यायला सांगितले होते. त्यांनी त्यांच्या नात्याला नकार देत तिच्याकडून तिचा मोबाईलही काढून घेतला होता. तसेच तिच्या इंटनेटच्या वापरावरही मर्यादा आणल्या.

तिच्या प्रियकराने मुलीला एक मोबाईल भेट दिला होता. ते दोघे अनेकदा त्यावरुनच संवाद साधायचे. वडिलांनी वारंवार समजावून सांगण्याचा त्यांना त्रास होऊ लागला. तेव्हा दोघांनी मिळून वडिलांच्या हत्येचा कट रचला. मुलीने वडिलांच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकल्या. प्रियकराला बोलावून घेतल. वडील बेशुद्ध पडल्यानंतर त्यांनी धारदार हत्याराने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.

आरोग्यविषयक वृत्त