15 वर्षाच्या मुलीचा बापाकडून गळा दाबून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे १५ वर्षीय मुलीचा सावत्र बापाने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली असून प्रकार सकाळीच घडलेला आहे. दरम्यान, खून झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत काही अघटित घडले आहे का ? हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होणार आहे.

खून केल्यानंतर सावत्र बाप पसार झाला असून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. मृत मुलीची बहीण शाळेतून घरी आली. तेव्हा, घराला बाहेरून कुलूप होते. त्यामुळे बराच वेळ तिने वाट पाहिली. त्यानंतर कंटाळून अखेर कुलूप तोडले. त्यावेळी ही घटना समोर आली. या अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केला आहे.

संजना विजय नायर (१५, रा. दापोडी) हिचा खून झाला आहे. तर विजय बबन चव्हाण (४४, रा. दापोडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी माला विजय नायर (रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. विजय आणि मुलगी संजना हिच्यात वाद झाला होता. गुरुवारी सकाळी विजय घरातून बाहेर गेला आणि परत आला. त्यावेळी तो माला यांना म्हणाला ‘आज तुम्हाला पिचर दाखवतो’. त्यावेळी माला म्हणाल्या ‘तू काय पिचर दाखवतो मीच तुला ट्रेलर दाखवते, माझ्या मुलींना हात तर लावून दाखव’ असे बोलणे झाले होते. दरम्यान माला घराबाहेर गेल्यानंतर हा प्रकार घडला. तपास भोसरी पोलिस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/