खळबळजनक ! धावत्या कारमध्ये 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, महाराष्ट्रातील घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवीयन मुलीचे अपहरण करुन धावत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. 29 जुलैच्या रात्री मुलगी घाटकोपर-मानखूर्द लिंक रोडवर एकटी चालत जात होती. त्यावेळी तिचे अपहरण करुन बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

मुलगी चालत जात असताना कार तिच्याजवळ थांबवण्यात आली. कारमधील तिघांनी तिला आत घेउन तेथून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पश्चिम द्रुतगती मार्गावर तिला सोडून दिले होते. पोलिसांनी मानखूर्दमधील शिवाजी नगर येथून तिन्ही आरोपींना 8 ऑगस्टला अटक केली. आरोपींची नावे सोनू उर्फ दीपक सिंग (25), नुरुल नलवर (25) आणि बाबू हकीम अन्सारी (22) यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार तसंच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमधील एकजण इलेक्ट्रिशिअन तर दुसरा चालक म्हणून काम करतो. तिसरा आरोपी बेरोजगार आहे. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या कारकडे टॅक्सी परवाना आहे. सर्व आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती झोन 6 चे डीसीपी शशीकुमार मीना यांनी दिली आहे.