खुशखबर ! केबल TV स्वस्त, आता फक्‍त 130 रूपयांंत 150 चॅनेल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केबल टीव्ही सबस्क्रायबरसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता केबलधारक फक्त 130 रुपयात आधीपेक्षा जास्त चॅनल पाहू शकतात. नवे टॅरिफ नियम लागू झाल्यानंतर अनेक ग्राहकांना तक्रार केली होती की त्यांना टीव्ही पाहणे पूर्वीपेक्षा जास्त महाग झाले आहे. दूरसंचार नियामक प्रधिकरणाने म्हणजे ट्रायने हेच दर कमी करण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनने ग्राहकांना दिलासा दिला आहे.

100 रुपयात 150 चॅनल –
डिजिटल केबल फेडरेशनने सब्स्क्रीपशन शुल्क कमी करण्यासाठी काही बदल केले आहेत. आता ग्राहकांना 130 रुपयात नेटवर्क कपॅसिटी शुल्कात म्हणजेच NCF शुल्कात 150 एसडी चॅनल मिळणार आहेत. आधी फक्त 100 वाहिन्या मिळत होत्या. बैठकीत चर्चा झाली की 130 रुपयांत 150 एसडी चॅनल दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या सबस्क्रायबर्सना 100 पेक्षा जास्त चॅनल पाहायच्या होत्या त्यांना प्रत्येक 25 वाहिन्यांसाठी वेगळे 20 रुपये द्यावे लागत होते. त्यामुळे 150 चॅनल पाहण्यासाठी त्यांना NCF शुल्क म्हणून जीएसटीसोबत 170 रुपये शुल्क भरावे लागत होते. आता फेडरेशनने केलेले हे बदल सध्या फक्त केबल टीव्ही धारकांसाठीच लागू आहेत. डीटीएच धारकांना याचा लाभ मिळवण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावा लागणार आहे.

ट्रायने याच वर्षी डीटीएच आणि केबल नेटवर्कसाठी नवे टॅरिफ दर लागू होतील अशी घोषणा केली होती. यानंतर केबल धारकांनी ओरड केली होती की महिन्याचे रिचार्ज, बिल वाढते. खरतर नव्या टॅरिफ नियम ट्रायने सबस्क्रायबर्सच्या टीव्ही पाहण्याच्या बिलात, शुल्कात कपात व्हावी म्हणून लागू केले होते, परंतू झाले उलटेच. ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल निवडीचा अधिकार देण्यात आला. याव्यतिरिक्त प्रत्येक 25 एसडी चॅनेलनंतर 20 रुपये नेटवर्क कपॅसिटी शुल्क आकारण्याची मुभा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि ब्रॉडकास्टरला देण्यात आली. एका एचडी चॅनेलची दोन एसडी चॅनेलशी तुलना होत असल्याने HD चॅनेलसाठी अतिरिक्त नेटवर्क कपॅसिटी शुल्क आकारण्याची मुभा सर्व्हिस प्रोव्हाडरला देण्यात आली होती.

आता पर्यंत केबलचे पॅकेज असे वाढत होते –
– बेसिक पॅक – 153 रुपये (100 चॅनल)
– अतिरिक्त 50 एसडी चॅनल – 200 रुपये
– अतिरिक्त 25 एचडी चॅनल – 400 रुपये
– नेटवर्क कपॅसिटी फी – 60 रुपये
– एकूण – 813 रुपये शुल्क