सौदी : शाही घराण्यातील 150 सदस्यांना ‘कोरोना’, किंग आणि क्राउन प्रिन्स सलमान ‘आयसोलेशन’मध्ये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात उच्छाद मांडला आहे. या विषाणूपासून कोणीही वाचू शकले नाही. मग तो सामान्य माणूस असो की हॉलिवूड अभिनेता असो वा मोठा राजकारणी, सर्वांनाच कोरोनाने वेढले आहे. आता सौदी अरेबियातूनही अशी बातमी येत आहे. येथील राजघराण्यातील 150 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजते. त्यानंतर किंग सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

माहितीनुसार, किंग फैसल स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर राजघराण्यावर उपचार करण्यात गुंतले आहेत आणि कोरोनाचा धोका वाढल्यामुळे रुग्णालय 500 अतिरिक्त बेड तयार करत आहे. रुग्णालयाकडून सांगण्यात आले कि, “देशभरातून येणाऱ्या व्हीआयपी रुग्णांसाठी व्यवस्था तयार केली जात आहे.” तसेच रुग्णालयाने डॉक्टरांना हाय अलर्ट संदेश पाठविला आहे. संदेशामध्ये म्हटले होते की, त्यांच्याकडे किती प्रकरणे येतील हे त्यांना माहिती नाही परंतु सर्व रुग्णांना काढून टाकले जाईल आणि फक्त गंभीर रुग्णांनाच पहिले जाईल जे शाही कुटुंबाशी संबंधित आहेत.

कोणत्याही संक्रमित कर्मचार्‍यास रियादच्या या टॉप रुग्णालयात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही जेणेकरुन शाही सदस्यांसाठी खोल्या सुरक्षित ठेवता येतील. दरम्यान, शाह सलमान (84) हे जेद्दाजवळ आयसोलेशनमध्ये गेले आहेत, तर क्राऊन प्रिन्स सलमान लाल समुद्र किनाऱ्याच्या दुर्गम भागात राहत आहेत.