Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील 1500 कैद्यांची तात्पुरत्या जामीनावर सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विविध कारागृहात बंदी असणाऱ्या तबल दीड हजार बंदीची सुटका करण्यात आली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. 27 ते 31 मार्च या कालावधीत त्यांना सोडण्यात आले आहे.

कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आले असून, राज्यात संचारबंदी आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहात असणाऱ्या बंदीवानांना सोडण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या व्हायरसची कारागृहात लागण झाल्यास मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता होती. तर कारागृहात संख्येपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने पॅरोल आणि जामीन देऊन सोडावे असे आदेश न्यायालयाने दिले होते.

त्यानुसार राज्यातील विविध कारागृहात असणारे 1 हजार 460 बंदी सोडले आहेत. 27 ते 31 मार्च या चार दिवसात बंदी सोडण्यात आले आहेत. यामध्ये देशविरोधी कारवाया, पोस्को, अंडर ट्रायल आणि शिक्षा भोगणारे कैदी याना वगळण्यात आले आहे. मात्र, 5 वर्षाखालील शिक्षा असणारे तसेच किरकोळ गुन्ह्यातील कैदी सोडले जात आहेत. देशभरातील 11 हजार बंदी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सुटणार आहेत. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात बोलविले जाणार आहे.

 

येरवडा मध्यवर्ती कारागृह- 88
सातारा जिल्हा कारागृह–27
कोल्हापूर जिल्हा कारागृह–30
कोल्हापूर सेंटर कारागृह–49
सांगली जिल्हा कारागृह–10
सोलापूर जिल्हा कारागृह–34
अहमदनगर जिल्हा कारागृह–25
औरंगाबाद सेंटर कारागृह– 64
नाशिकरोड सेंटर कारागृह– 40
उस्मानाबाद जिल्ह्य कारागृह– 11
लातूर जिल्हा कारागृह– 22
नांदेड जिल्हा कारागृह– 00
परभणी जिल्हा कारागृह–47
बीड जिल्हा कारागृह– 11
जालना जिल्हा कारागृह– 14
जळगाव जिल्हा कारागृह–41
भुसावळ जिल्हा कारागृह–14
धुळे जिल्हा कारागृह– 24
नागपूर जिल्हा कारागृह–6
मुंबई सेंटर कारागृह– 167
ठाणे सेंटर कारागृह–55
तळोजा सेंटर कारागृह– 21
कल्याण जिल्हा कारागृह–04
भायखळा जिल्हा कारागृह–22
भायखळा महिला कारागृह–12
अलिबाग जिल्हा कारागृह–7
रत्नागिरी जिल्हा कारागृह–35
सावंतवाडी जिल्हा कारागृह–06

नागपूर सेंट्रल कारागृह– 112
अमरावती सेंट्रल कारागृह–122
बुलढाणा जिल्हा कारागृह–20
अकोला जिल्हा कारागृह–90
वाशीम जिल्हा कारागृह–16
यवतमाळ जिल्हा कारागृह–50
वर्धा जिल्हा कारागृह– 76
चंद्रपूर जिल्हा कारागृह–66
भांडार जिल्हा कारागृह– 32