Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 1553 नवीन रूग्ण अन् 36 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांचा आकडा 17265 वर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचं देशात थैमान चालूच आहे. देशात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 1553 नवीन रूग्ण आढळले असून 36 जणांचा बळी गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशभरातील कोरोना प्रकरणांची संख्या आता 17 हजार 265 वर जाऊन पोहचली आहे.


देशातील रेड झोनमधील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे तर पुण्या सारखं संपुर्ण शहर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, गोवा आणि मणिपूर हे पुर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये लातूर आणि उस्मानाबाद जिल्हयांचा समावेश आहे. मात्र, देशातील परिस्थिती पाहता नागरिकांनी आणखी काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या 24 तासामध्ये 1553 नवीन रूग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 36 जणांचा मृत्यू झाला आहे.