Lockdown : 156 परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनबाबत गुन्हे दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना प्रतिबंध करण्यासाठी राज्यात सर्वत्र लाँकडाऊन सुरू आहे. या काळात पोलिस विभागाने व्हिसा उल्लंघन केल्याप्रकरणी 156 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

या 156 विदेशी नागरिकांच्या विरोधात Foreigner’s Act section 14 B व भा.दं.वि.कलम 188,269,270 नुसार गुन्हा नोंदविला आहे.
मुंबई , ठाणे , नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपुर, पुणे, अहमदनगर, चंद्रपुर व गडचिरोली मध्ये हे एकूण 156 गुन्हे नोंदविले आहेत.

हे सर्व विदेशी नागरिक पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले आहेत. ते व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करून दिल्लीच्या (निज़ामुद्दीन) ‘मरकज’मध्ये सामिल झाले होते. या परदेशी नागरिकांमध्ये कज़ाखस्तान -9, दक्षिण अफ़्रीका -1, बांगलादेश-13, ब्रूने-4, आयवोरियन्स-9, ,इराण-1, टोगो-6, म्यानमार-18, मलेशिया-8, इंडोनेशिया-37,बेनिन-1,फ़िलीपींस-10,अमेरिका-1,टांज़ानिया-11, रशिया-2, जिबोती-5, घाना-1, किर्गिस्तान-19 या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना institutional Quarantine मध्ये ठेवलं आहे.