Coronavirus : दिल्लीत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1573 नवे रुग्ण तर 37 जणांचा मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. रविवारी (दि.12) दिल्लीमध्ये कोरोनामुळे संसर्गाचे 1573 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर या कालावधीत या साथीच्या आजारामुळे 37 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी दिल्लीत संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 12 हजार 494 झाले आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3371 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, रविवारी राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1573 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यासह कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 12 हजार 494 झाले आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे 19155 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासामध्ये 2276 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 89968 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले की, ‘सुरक्षा कवच’च्या माध्यमातून राष्ट्रीय राजधानीत कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे सांगितले. दिल्ली सरकार घरगुती क्वारंटानमध्ये राहणाऱ्या कोरोना रुग्णांना प्लस ऑक्सी मीटत देत आहे. जेणेकरून ते वेळोवेळी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकतील. केजरीवाल यांनी पल्स ऑक्सी मीटरला सुरक्षा कवच नाव दिले आहे.