राज्यातील १५८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील १५८ जिल्हा न्यायाधीशांच्या सर्वसामान्य वार्षिक बदल्या करण्यात आल्या आहेत.  मुंबई उच्च न्यायलायचे रजिस्ट्रार एस. पी. तावडे यांनी गुरुवारी संकेतस्थळावर यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील १० न्यायाधीशांचा समावेश आहे.

डी. जी. मुरुमकर (पुणे ते ठाणे), विकास शिवरुपराव कुलकर्णी (पुणे ते खामगाव बुलढाणा), एस. एम. मेंजगे (पुणे ते वाशीम), एस. के, कऱ्हाळे (पुणे ते नागपूर), एन. बी. शिंदे (बारामती पुणे ते हिंगोली), एन. के. मनेर (पुणे ते लातूर फॅमिली कोर्ट), आर. व्ही. कोकरे (पुणे ते पुसद), ए. एस. सलगर (खेड ते कंधार), आर. बी. देशपांडे (बारामती ते रिटेन्ड), पी. आर. अष्टूरकर (पुणे ते रिटेन्ड),

तर पुण्यात बदलून आलेले न्यायाधीश

आर. एम. पांडे (अहमदनगर ते पुणे), व्ही, के. यावलकर (नागपूर ते पुणे), एस. आऱ. नावंदर (अहमदनगर ते पुणे), एस. आर. तांबोळी (मुंबई ते पुणे), एच. आर. वाघमारे (नांदेड ते पुणे), एच. के. गनत्रा (मुंबई ते फॅमिली कोर्ट पुणे), ए. एम. अंबाळकर (पुसद ते खेड  राजगुरुनगर), आर. व्ही, लोखंडे (माणगाव ते बारामती),