कारवारमध्ये बोट उलटून १६ जणांचा मृत्यू 

कारवार (कर्नाटक) : पोलीसनामा  ऑनलाईन- कर्नाटकातील कारवार येथे देवदर्शनासाठी निघालेल्या बोटीला अपघात होऊन १६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे ANI ने म्हंटले आहे. या बोटीत एकूण २४ प्रवासी होते. त्यापैकी मच्छीमार आणि तटरक्षक जवानांना आतापर्यंत १६ मृतदेह सापडले आहेत. तर उर्वरित भाविकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. भारतीय नौदलाला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले आहे. गोव्याहून चेतक हेलिकॉप्टर सुद्धा मागवण्यात आले आहे.बुडालेल्या प्रवाश्यांना शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर चालू आहे. स्थानिकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे.