दुर्देवी ! भरधाव ट्रकची 2 टेम्पोंना भीषण धडक, 16 जणांचा मृत्यू

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूर येथे मंगळवारी (दि.27) जमुकाजवळील राष्ट्रीय महामार्ग 24 वर भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने दोन टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहजहाॅंपूर येथील मेडिकल काॅलेजमध्ये उपचार सुरु आहेत. ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.

Image

अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, सातापूरहून भरधाव येणाऱ्या ट्रकने लखनौ-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर एका टेम्पोला मागून धडक दिली. यानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात पडला. याच ट्रकने पुढे जाऊन आणखी एका टेम्पोला जोरदार धडक दिली.

Image

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –