16 MLAs Disqualification | जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता हे आधी ठरवावे लागेल, नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्याच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत (16 MLAs Disqualification) निर्णय घ्यावा असं निकालात नमूद केलं आहे. त्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी मंगळवारी विधानभवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची (16 MLAs Disqualification) प्रक्रिया कशी असेल हे स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

कोणतीही घाई केली जाणार नाही

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कोर्टाकडून संविधानिक शिस्त (Constitutional Discipline) कायम ठेवत हा निर्णय विधिमंडळाकडे दिला असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. तसेच लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल. परंतु याबाबत कोणतीही घाई केली जाणार नाही. सर्व मुद्दे लक्षात घेऊन 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (16 MLAs Disqualification) निर्णय घेतला जाईल असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

 

जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता

राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, माझ्याकडे 54 आमदारांच्या पाच याचिका आहेत. जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता हे आधी ठरवावे लागणार आहे. त्या आधारावर निर्णय घेतला जाईल. हे करत असताना शिवसेनेच्या (Shivsena) घटनेचा देखील अभ्यास केला जाणार आहे. पक्ष घटनेनुसार चालतो का? हे देखील पाहिले जाईल, असं नार्वेकरांनी सांगितलं.

 

Advt.

ठाकरे गटाचं निवेदन आलं नाही

सोमवारी ठाकरे गटाने (Thackeray Group) विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेतली.
अध्यक्ष विदेश दौऱ्यावर असल्याने 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात आपण निर्णय घ्यावा अशी मागणी
ठाकरे गटाने नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केली होती. यासंदर्भात राहुल नार्वेकर यांना विचारले असता,
अद्याप या संदर्भात ठाकरे गटाचं कोणतंही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही असं सांगितलं.

 

 

 

Web Title :  16 MLAs Disqualification | assembly speaker rahul narvekars press conference regarding the satta sangraha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा