16 MLAs Disqualification | राहुल नार्वेकरांच्या ‘त्या’ निर्णयावर झिरवाळांचा टोला, म्हणाले- ‘असे निर्णय…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत (16 MLAs Disqualification) निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत (16 MLAs Disqualification) निर्णय घेण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. दोन्ही गटाकडून पक्षाची घटना न मागवता आता निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शिवसेना पक्षाची घटना (Shivsena Party Constitution) मागवण्याचा निर्णय नार्वेकर यांनी घेतला आहे. यावरुन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी नार्वेकर यांना टोला लगावला आहे.

राहुल नार्वेकर हे भाजप आमदार (BJP MLA) असून ते पक्षांतर करुन भाजपात आले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षांतराचं वावडं नसेल, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांच्याकडून न्याय्य निकाल येणार नसल्याचा दावा विरोधक करत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत (16 MLAs Disqualification) सविस्तर तपास करुन कायद्याच्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करुन निर्णय घेतला जाईल असं नार्वेकर यांनी सांगितलं आहे. यामुळे ते नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना नरहरी झिरावाळ यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

काय म्हणाले नरहरी झिरवाळ?

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी पक्षाची घटना तपासणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं.
यावर झिरवाळ म्हणाले, लवकरात लवकर निर्णय घेणं ही केवळ राजकीय व्यासपीठावरील सभागृहाची भाषा आहे.
असे निर्णय काही लवकर लागत नाहीत, असा खोचक टोला झिरवाळ यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, या विषयात फार तपास करण्यासारखं काहीच नाही.
मात्र तरी विधानसभा अध्यक्षांना खात्री करण्याचा अधिकार आहे.
सुप्रीम कोर्टानं या खटल्यासंदर्भात दहा-बारा बाबी सांगितल्या आहेत, त्या सर्व विरोधात आहेत.
त्यातील फक्त एकच बाब तपासायची आहे, असं झिरावाळ यांनी सांगितलं.

Advt.

Web Title : 16 MLAs Disqualification | narahari jirwal criticizes rahul narvekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं