राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी एकुण १६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यासह भंडारा, सोलापूर, शिर्डी, अमरावती, सातारा, बुलडाणा आणि जालना येथील गणेशभक्तांचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. पुण्यातील देहुगाव येथे इंद्राणी नदीपात्रात गणपती विसर्जन करताना एका १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. संदीप साळुंखे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच जुन्नर तालुक्यात चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c1f8d80-bfa6-11e8-a761-25bd5cd5599f’]

पुणे ग्रामीणमध्ये घडलेल्या दोन घटनांमध्ये इंद्रायणी नदीत बुडून एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला. तरुण बुडाल्याची माहिती कळताच एनडीआरएफच्या जवानांनी त्वरित त्याचा शोध घेण्याचे काम सुरु केले. तब्बल तीन तासानंतर त्याला शोधण्यात जवानांना यश आले. त्याला पाण्यातून बाहेर काढले तेंव्हा तो जिवंत होता. त्यानंतर त्याला तात्काळ पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी खोल पाण्यात जाणे टाळावे असे आवाहन केले होते. तसेच जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळाले. कावळ पिंपरी येथे सायंकाळी ही घटना घडली. मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

[amazon_link asins=’8193341589′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d98e7b38-bfa6-11e8-89c5-458f021d3646′]

नगरच्या संगमनेर शहरात प्रवरा नदीच्या पात्रात गणेश विसर्जनासाठी उतरलेले दोन तरुण वाहून गेले. या दोघांपैकी एकाला वाचवण्यात आले. तर नीरव जाधव अजूनही बेपत्ता आहे. अमरावतीच्या वरुड तालुक्यात एका खदानीत गणेश विसर्जनासाठी उतलेल्या राहुल नेरकर नामक तरुणाचा बुडून मृत्यू झाला. साताऱ्यातील माहुली गावाजवळील कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला. सोलापूरातही एकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला. बुलडाण्यातील शेलगावात धरणात गणेश विसर्जनासाठी उतरलेल्या महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके या दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावू न दिल्याने पोलीसाचे फोडले डोके

जालना शहरातील मोती तलावात गणरायाच्या विसर्जनासाठी खूप मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोती तलावात गणपती विसर्जनासाठी आलेला अमोल संतोष रणमुळे हा तलावातील पाण्यात उतरला, मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर लक्कडकोट भागातील निहाल खुशाल चौधरी (वय २६), शेखर मधुकर भदनेकर (वय २०) यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मोती तलाव येथे सुरक्षा वाढविली होती.