धारावी : ‘कोरोना’वर मात करून ‘ते’ योद्धे पुन्हा कर्तव्यावर ‘हजर’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्या विभाग, पोलीस दल यासह प्रशासनातील विविध घटक अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या योद्ध्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. कोरोनाची लागण झालेले धारावी पोलीस ठाण्यातील 16 पोलीस पूर्णपणे बरे होऊन सेवेत रुजू झाले आहेत. या पोलीस ठाण्यातील 32 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 31 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

धारावी झेपडपट्टी परिसरात अनेक चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये हे पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत होते. मुंबईतील सर्वाधिक कोरोनाबाधिक रुग्ण सध्या धारावी परिसरात आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील 32 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 31 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात एका सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, 29 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

धारावी पोलीस ठाण्यातील केवळ एक पोलीस कोरोनावर उपचार घेत असून सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. बाकीच्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून काही दिवस क्वारंटाईनमध्ये रहण्यास सांगितले आहे. धारावी परिसरात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक पोलिसांनाही त्याची लागण झाली. त्यामुळे धारावी पोलिसांनी जागृती व समुपदेशन देण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

पोलिसांना थर्मास देण्यात आले असून त्याच्या सहाय्याने पोलिसांना नियमीत गरम पाणी प्यायला मिळतेय. याशिवाय पोलिसांना प्रतिबंधात्मक गोळ्या, विटामिनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 19 मे पासून धारावी पोलीस ठाण्यात कोणताही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही