Thane News : दिव्यातील तलावात १६ वर्षाचा मुलगा बुडाला

मुंब्रा : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी दुपारी पोहण्यासाठी आगासन येथील तलावात आर्यन चिपी हा १६ वर्षाचा अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रासह गेला होता. तो दिव्यातील बेडेकर नगर येथील खडवली देवी चाळीतील रहिवासी आहे. तलावात तेथील पाण्याचा अंदाज त्याला आला नाही तसंच दम लागल्यामुळे तो तलावात बुडाला. शिळ तसेच मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

आर्यन हा त्याच्या तीन चार मित्रांसह आज रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तलावात पोहायला गेला होता. मात्र, पोहताना तलावात मध्यभागी असताना त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुलगा सापडलेला नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.