निरा नदीत पाय घसरून 16 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

इंदापूर : सुधाकर बोराटे – नरसिंहपूर (ता.इंदापूर ) येथील निरा नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी मुलाचा पाय घसरून नदीत पडल्याने पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली असुन, या घटनेमुळे नरसिंहपूर व परिसरामध्ये शोककळा पसरली असुन नागरीकांतुन हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबतची खबर मयत मुलाचे मामा सागर चंद्रकांत सावंत (वय 27) रा. नरसिंहपूर,ता.इंदापूर,जि.पूणे यांनी इंदापूर पोलीसात दीली आहे.बुधवार दिनांक 8 जुलै 2020 रोजी सकाळी 10:30 वा.चे सुमारास विकी रामचंद्र मोहिते (वय 16) रा.नरसिंहपूर,ता.इंदापूर,जि.पूणे हा मौजे नरसिंहपूर गावचे हद्दीतील निरा नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला होता.त्यावेळी नदीच्या काठावरून नदीत उतरत असताना अचानक पाय घसरल्याने तो नदीच्या पाण्यात पडला त्यावेळी त्याचे सोबत असणार्‍या मुलांनी आरडा ओरडा केल्याने विकीचा मामा तेथे आला व त्याने पाण्यामध्ये त्याचा शोध घेतला असता तो पाण्यात कोठेही दीसला नाही.

घटनेचे गांभिर्य ओळखुन विकीचा मामा सागर सावंत व गावातील ग्रामस्थ यांनी नदीच्या पाण्यात उतरून दोन ते तीन तास विकीचा शोध घेतल्या नंतर विकीची बाॅडी पाण्यात आढळुन आली. त्याला तात्काळ इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय इंदापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.त्याची वैद्यकीय तपासणी केली असता सदर मुलगा मयत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले असुन याबाबतची खबर मयत अल्पवयीन मुलाचा मामा सागर सावंत याने इंदापूर पोलीसात दीली असुन पुढील तपास पोलीस नाईक आटोळे हे करत आहेत.

विकी उर्फ नानाच्या मृृृत्युने नरसिंहपूर हळहळले.

विकी उर्फ नाना राजेंद्र मोहीते हा चैतन्य विद्यालय नरसिंहपूर येथील विद्यालयात इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकत होता. त्याने मार्च 2020 मध्ये इयत्ता 10 वी ची वार्षिक परिक्षा दीली असुन घरात एकुलता एक असल्याने तो आजी-आजोबांचा लाडका होता.त्याचे पश्चात आई-वडील,आजी-आजोबा व एक मोठी अविवाहीत बहीण असा परिवार आहे.तो स्वभावाने मनमिळावु व सर्वाशी अपुलकीने वागणारा गुणी विद्यार्थी असल्याने त्याच्या दुर्दैवी जाण्याने नरसिंहपूर परीसरात व तो शिकत असलेल्या विद्यालयामध्ये शोककळा पसरली असुन त्याच्या दुखद जाण्याने नरसिंहपूर वासीयांवर दुख्खा:चा डोंगर कोसळला असुन चैतण्य विद्यालय एका गुणी विद्यार्थ्याला पोरके झाले असल्याचे मत विकीला शिकविणारे शिक्षक गोरख शिवदास लोखंडे यांनी व्यक्त केले आहे.