अवयवदान केलेल्या ‘त्या’ ब्रेनडेड मुलाला १२ वीत ६१ टक्के गुण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुंबईतील सोळा वर्षांचा ओमकार लडबे हा बाथरूममध्ये पडल्याने गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी त्या ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याचे अवयव दान करण्यात आले. त्याच्या अवयवदानामुहे अनेक रूग्णांना जीवदान मिळाले. मात्र, अनेकांना जीवनाच्या परिषेत पास करणारा ओमकार स्वत:चा बारावीचा निकाल पाहू शकला नाही. बारावीचा परीक्षेत त्याला ६१ टक्के गुण मिळाले आहेत. आज ओमकार या जगात नसला तरी अवयवरूपी तो त्याचे अस्तित्व या जगात आहे. स्वत: जीवनाची परीक्षा तो नापास झाला असला तरी जाता जाता त्याने अनेकांना जीवनाच्या परीक्षेत पास केले आहे. सोळा वर्षांच्या आपल्या ब्रेनडेड मुलाचे लडबे कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने ५ जणांना जीवनदान मिळाले आहे.

सोळा वर्षांचा ओमकार बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला होता. त्यास उपचारासाठी कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यास अखेर डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. अवयवदानासाठी डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबाचे समुपदेशन केल्यानंतर या मुलाचे अवयवदान करण्यात आले. या ब्रेनडेड मुलाच्या कुटुंबाने अवयवदानाची परवानगी दिल्यानंतर त्याचे हृदय, यकृत आणि दोन्ही किडनी दान करण्यात आल्या.

हृदय कोलकाता फोर्टिस रुग्णालयात पाठवण्यात आले. यकृताचे २ भाग करण्यात आले. यकृताचा एक भाग ग्लोबल रुग्णालयातील १६ वर्षीय रुग्णाला आणि दुसरा ७ महिन्यांच्या बाळाला देण्यात आला. तर एक किडनी ग्लोबल रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. दुसरी किडनी ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आली, अशी माहिती ग्लोबल रुग्णालयातील झेडटीसीसीचे समन्वयक राहुल वासनिक यांनी दिली. अशाप्रकार ५ रूग्णांना जीवदान देणारा ओमकार बारावी परीक्षेत ६१ टक्के गुणांनी पास झाला आहे.

You might also like