ब्रेनडेड १६ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे ५ जणांना जीवदान

पोलीसनामा ऑनलाइन – एका सोळा वर्षांच्या बे्रनडेड मुलाच्या कुटुंबियांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने ५ जणांना जीवनदान मिळाले आहे. हा सोळा वर्षांचा मुलगा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला होता. त्यास उपचारासाठी कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यास अखेर डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. अवयवदानासाठी डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबाचे समुपदेशन केल्यानंतर या मुलाचे अवयवदान करण्यात आले.

या ब्रेनडेड मुलाच्या कुटुंबाने अवयवदानाची परवानगी दिल्यानंतर त्याचे हृदय, यकृत आणि दोन्ही किडनी दान करण्यात आल्या. हृदय कोलकाता फोर्टिस रुग्णालयात पाठवण्यात आले असून यकृताचे २ भाग केले. यकृताचा एक भाग ग्लोबल रुग्णालयातील १६ वर्षीय रुग्णाला आणि दुसरा ७ महिन्यांच्या बाळाला देण्यात आला. तर एक किडनी ग्लोबल रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. दुसरी किडनी ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आली आहे, अशी माहिती ग्लोबल रुग्णालयातील झेडटीसीसीचे समन्वयक राहुल वासनिक यांनी सांगितले.