Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा नवा ‘उच्चांक’ , 24 तासात 160 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात शनिवारी (दि.20) कोरोना संसर्गामुळे 160 जणांचा मृत्यू झाला तर 3 हजार 874 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा हा नवा उच्चांक ठरला आहे. सध्या राज्यात 58 हजार 054 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर 50.04 टक्के एवढा असून आज 1380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 64 हजार 153 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 160 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू – ठाणे 136 (मुंबई 136), नाशिक 10 (जळगाव 10), पुणे 6 ( पुणे 1, सोलापूर 1), औरंगाबाद 7 ( औरंगाबाद 5, जालना 1) राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5984 झाली आहे. राज्यात 5 लाख 94 हजार 719 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 25 हजार 099 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत शनिवारी कोरोनाचे 1197 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 65 हजार 265 वर पोहचला आहे. तर कोरोनामुळे आज 136 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3559 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.