Coronavirus : दिल्लीत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1606 नवे रुग्ण, 35 जणांचा मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. मंगळवार (दि.14) दिल्लीमध्ये कोरोनामुळे संसर्गाचे 1606 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर या कालावधीत या साथीच्या आजारामुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी दिल्लीत संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 15 हजार 346 झाले आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3446 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1606 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यासह कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 15 हजार 346 झाले आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे 18664 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासामध्ये 1924 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 93236 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना विषाणूच्या संक्रमामुळे होणाऱ्या परिणांविषयी महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये सातत्याने घट होत आहे आणि संक्रमित लोक बरे होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. असे असले तरी दिल्लीकरांगिरीने रहावे असा सल्ला केजरीवाल यांनी दिला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली पॅटर्न स्विकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, पंतप्रधानांनी दिल्ली मॉडेलच्या यशाची कबुली दिल्याचे पाहून मला आनंद झाला आहे.