चीनवरून आलेल्या जहाजामध्ये होते 16076 भारतीय प्रवाशी, पोर्टवर उतरण्याची नाही मिळाली परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 16,076 क्रू मेंबर्स आणि प्रवासी जे चीन किंवा कोरोना व्हायरसमुळे प्रभावित देशांमध्ये गेले आहेत त्यांना भारतीय बंदरात उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. शिपिंग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, नियुक्त केलेल्या ठिकाणी तैनात असलेल्या 452 जहाजांतील हे प्रवासी आणि चालक दल सदस्यांना ताप किंवा काही लक्षणे आढळल्यास वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मार्गदर्शक सूचनांअंतर्गत संभाव्य मदत दिली जात आहे.

अधिकाऱ्याने संगितले कि, “आयात-निर्यात मालवाहू असणारी 452 जहाजे आणि 16,076 चालक दल सदस्य आणि यापूर्वी चीन किंवा कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या देशांतून प्रवास करणारे प्रवासी आतापर्यंत भारतीय बंदरांवर दाखल झाले आहेत. कोणताही प्रसार रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. आम्ही प्रवाशांना आणि वाहनचालकांना जहाजातून उतरण्यास परवानगी दिली नाही, परंतु जहाजांना निश्चित ठिकाणी थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते म्हणाले, “संक्रमित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या चालक / प्रवाशांना किनाऱ्याचा पास देण्यात आलेला नाही. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शनानुसार जहाजावर सर्वांची तपासणी केली जात आहे आणि त्यांना आवश्यक गोष्टी पुरविल्या जात आहेत.”

ते पुढे म्हणाले कि, पारादीप बंदरातील चेमस्टार स्टेलर जहाजातील एका सदस्याला ताप आला. त्यांच्या व त्यांची पत्नी यांना बाहेर काढण्यात आले व पुढील तपासणीसाठी कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले. हे जहाज 10 फेब्रुवारीला चीनच्या जापुहून निघाले आणि 1 मार्चला ते पारादीप बंदरात पोहोचले. भारतात 12 मोठी बंदरे आहेत. जवळपास 200 लहान बंदरे ही राज्यांच्या नियंत्रणाखाली आहेत.