Coronavirus : दिल्लीत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1647 नवे रुग्ण तर 41 जणांचा मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. बुधवारी (दि.15) दिल्लीमध्ये कोरोनामुळे संसर्गाचे 1647 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर या कालावधीत या साथीच्या आजारामुळे 41 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी दिल्लीत संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 16 हजार 993 झाले आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3487 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, रविवारी राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1647 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यासह कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 16 हजार 993 झाले आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे 17807 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासामध्ये 2463 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 95 हजार 699 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, देशात करोनाचा संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 29 हजारांहून अधिक नवीन संसर्गाच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9 लाखाच्या पुढे गेली आहे. तर 24309 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले असून देशात सहा लाखाच्या जवळपास रुग्ण बरे झाले आहेत.