काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं ‘भगदाड’ ! 17 आमदार भाजप प्रवेशासाठी इच्छुक, चौघांचा 31 ऑगस्टला प्रवेश

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी पक्षांतर केले असून काही नेते युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असून येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत,’ असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना दानवे यांनी हे विधान केले आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘विरोधी पक्षाचे अनेक आमदार प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित नव्हते यावरून काय ते समजा. राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असून येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्याजवळ आता कोणताच झेंडा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत.

पक्षांतरावरून सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरही दानवेंनी वक्तव्य केले आहे. विधानपरिषदेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पूर्वी भाजपमध्ये होते आणि सध्या राष्ट्रवादीच्या यात्रेचे नेतृत्व करणारे अमोल कोल्हे पूर्वी शिवसेनेत होते, हे सुप्रिया सुळेंनी लक्षात घ्यावं अशी आठवण त्यांनी करून दिली.

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षांतर केले असून काही नेते युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर आणि अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –