नवी मुंबईतून १७ कोटीच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नवी मुंबई येथून तब्बल १७ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सुत्रधारासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना इम्पोर्टेट सिगारेट नवी मुंबई येथून पाठवल्या जात असल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी सिगारेट पाठवण्यात येत असलेल्या कार्गोची तपासणी केली. त्यावेळी १६ कोटी ८४ लाखांच्या परदेशातील सिगारेट कार्गोतून पाठवल्या जात असल्याचे दिसून आले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या महागड्या सिगारेट जप्त केल्या आहेत.

कार्गोत ४० फुटांचे कंटेनर आढळून आले असून एकूण ९३ लाख ६० हजार सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. ६५० कार्टून्समध्ये इम्पोर्टेड गुडन गरम सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे इम्पोर्टेड सिगारेटने भरलेले कंटेनर असून कार्गो मात्र वॉश बेसिन नावाने होता. डीआरआयने या सिगारेट तस्करीमागील सूत्रधारासह इतर तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like