Coronavirus : ‘या’ कारणामुळं राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत झाली वाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्थिती गंभीर असून, स्थलांतरित मजुरांमुळे ग्रामीण भागातही प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. एकही रुग्ण नसलेल्या 17 जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. या जिल्ह्यांमध्ये आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण स्थलांतरित मजूर असल्याचे दिसून आले आहे.

मजुरांनी घराकडे स्थलांतर केल्यास कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही भीती खरी ठरताना दिसू लागली आहे. मुंबई, पुणे, ठाणे व मालेगाव यासारख्या शहरातून प्रवास करून घरी परतलेल्या मजुरांमुळे इतर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 30 एप्रिलपर्यंत मुंबई, पुणे या दोन महत्त्वाच्या हॉटस्पॉट असलेल्या शहरात राज्यातील एकूण रुग्णांपैकी 78.4 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. 31 एप्रिलपर्यंत या शहरातील रुग्णांसंख्या 70 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीपासून मजुरांचे लोंढे घराच्या दिशेने जाण्यास सुरूवात झाली. त्यानंतर मागील 20 दिवसांमध्ये राज्यातील 17 जिल्ह्यांत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्या आली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे मुंबई महत्त्वाचे केंद्र ठरले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. इतर शहरातून येणार्‍या लोकांपेक्षा मुंबईतून परतणार्‍या लोकांमध्ये जास्त करोना बाधित रुग्ण असल्याचे दिसून आले आहे,

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like