बांगलादेशातील मशिदीत झालेल्या AC च्या विस्फोटातील मृत्यूची संख्या 17 वर, 20 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशची राजधानी ढाकाच्या (Dhaka) हद्दीतील मशिदीत गॅस गळतीमुळे एकाच वेळी सहा एअर कंडिशनर्समध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एका बालकासह 17 जण ठार तर 20 जखमी जण जखमी झाले आहेत. ही माहिती शनिवारी अग्निशमन सेवेच्या अधिका्यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास नारायणगंज मध्य जिल्ह्यातील (Narayanganj) बेतुल सलात मशिदीत नमाजच्या वेळेस हा स्फोट झाला.

‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, शेख हसीना नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी रुग्णालयात सात वर्षांच्या मुलासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या रुग्णालयात सध्या सुमारे 20 जणांवर उपचार सुरू आहेत. या स्फोटाचा सध्या चौकशी चालू असून जर या चौकशीत निष्काळजीपणाचे काही पुरावे सापडल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती नारायणगंजचे पोलिस अधीक्षक मोहम्मद झायेदुल आलम यांनी दिली. तसेच बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि पीडितांसाठी सर्व शक्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सूचनाही दिल्या आहेत.

नियमितपणे तपासणी होत नसल्यामुळे बांगलादेशात खराब गॅस पाइपलाइनच्या स्फोट होऊन बर्‍याचदा मृत्यू होतात. जुलै आणि ऑगस्टमध्ये गॅस सिलिंडर्ससह दोन वेगवेगळ्या अपघातात किमान दोन लोकांचा मृत्यू. गेल्या काही दिवसांपुर्वी ढाकामध्ये फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सात मुलांचा मृत्यू झाला होता.