Budget २०१९: ‘या’ १७ पर्यटन स्थळांचा ‘असा’ होणार ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून विकास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत खास आर्थिक तरतूद देखील केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,’सरकार १७ आइकॉनिक टुरीझम साइट म्हणजेच विशेष पर्यटन क्षेत्रे विकसित करत आहे. ज्याद्वारे देशातील तसेच परदेशातील ग्राहकांना आकर्षित करता येऊ शकेल.’ यासंदर्भात यापूर्वीही शासनाची घोषणा झाली असून जाणून घेऊयात कोणती आहेत ही स्थळे आणि कसा होणार त्यांचा विकास.

ही १७ पर्यटनस्थळे विशेष स्थळे म्हणून घोषित होणार :
या १७ पर्यटनस्थळांचा उल्लेख सरकारने २०१८-१९ च्या बजेटमध्ये देखील केला होता. त्यानंतर तत्कालीन पर्यटन मंत्र्यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली होती. या १७ पर्यटनस्थळांमध्ये उत्तर प्रदेश मधील ताजमहाल आणि फतेहपूर सीकरी, दिल्ली मधील हूमायून चा मकबरा, लाल किल्ला आणि कुतुब मीनार, गोव्याचा कोल्वा बीच, राजस्थान येथील अजमेरचा किल्ला, गुजरात मधील सोमनाथ आणि धोलावीरा, मध्यप्रदेशातील खजुराहो, कर्नाटक तेथील हंपी, तमिळनाडुतील महाबलीपुरम, आसाममधील कांजीरंगा, केरळ येथील कुमारकोम तर बिहार येथील महाबोधि यांचा समावेश आहे.

केंद्र आणि राज्य मिळून करणार विकास :
याआधीच घोषित केल्याप्रमाणे या स्थळांचा विकास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्याचा पुरातत्व सर्वेक्षण विभाग मिळून करणार आहेत. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार करता आवश्यक असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या सुविधा पुरवल्या जातील तसेच पर्यटकांना ठिकाणांविषयी माहिती देण्यासाठी विशेष सोयदेखील केली जाणार आहे.

विकासानंतर होणार हे बदल :
१. पूर्णपणे विकसित झाल्यानंतर या पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी अतिरिक्त सुरक्षा पूरवली जाणार आहे.

२. साफ सफाई उत्तम दर्जाची असेल आणि ग्रीन टेक्नोलॉजी चा प्रामुख्याने वापर होणार आहे.

३. या स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी सोय करताना चांगल्या वाहनांच्या व्यवस्थेकडे लक्ष पुरवण्यात येणार आहे.

४. स्थानिक लोकांच्या सहभाग आणि भागीदारीतून पर्यटकांना अधिकाधिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

५. या स्थळांच्या जाहिरातीसाठी खाजगी गुंतवणूकदारांची देखील मदत घेतली जाणार आहे.

कडूलिंबाच्या पानांचा हा फेसपॅक तुमचे सौंदय आणखी वाढवेल

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात