लोणावळ्यात सहलीला आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थीनीचा कुमार रिसॉर्टमधील वॉटर पार्कमध्ये बुडून मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीचा कुमार रिसॉर्टच्या वॉटर पार्कमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधावरी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली.

नीलू महेश म्हेत्रे (वय १७, रा. अंधेरी इस्ट) असे मृत मुलीचे नाव आहे.

नीलू म्हेत्रे ही मुंबईतील स्नेब सदन संस्थेच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनी आहे. आश्रमशाळेतील ८७ मुली लोणावळा येथे सहलीला आल्या होत्या. त्यावेळी काही मुली कुमार रिसॉर्टमधील वॉटर पार्कध्ये पोहण्यासाठी उतरल्या. तेव्हा नीलू वॉटर पार्कशेजारी उभी होती. मात्र खेळताना तिला धक्का लागला. त्यानतर ती पाण्यात पडली. त्याचवेळी तिथे असलेल्या संस्थेच्या ड्रायवर आणि रिसॉर्टच्या लाईफ सेविंग गार्डने तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा च्यावर उपचारापुर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान याप्रकऱणी संस्थेचे चालक फादय गोएल पॅट्रीक (वय ४६, अंधेरी ) यांनी लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक बीएस सांगले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तेथे धाव घेतली.

सुरक्षेत हलगर्जीपणा

कुमार रिसॉर्टमध्ये सुरक्षेचे उपाय नसल्याचे या घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान ८७ मुली रिसॉर्टमध्ये आलेल्या असताना व्यवस्थापनाने हवी ती सुरक्षा पुरविली नसल्याचे समोर आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like