खळबळजनक ! पंढरपूरमध्ये दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पंढरपूर : पोलिसनामा ऑनलाइन – पंढरपुरात एक संतापजनक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. एका नराधम आरोपीने पिडीतेचा बलात्काराचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याची धमकी दिली आहे.

आरोपीने या मुलीला एका अनोळखी ठिकाणी बोलावले. पीडित ही आरोपींपैकी एकाची मैत्रीण होती. ज्यावेळी ती त्या ठिकाणी पोहचली. त्यावेळी इतर ४ जण सुद्धा तिथे होते. त्यांनी तिला दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यातील एकाने या सर्व घटनेचे चित्रण केले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या मुलीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. याचाच गैरफायदा घेऊन या नराधमांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तसंच तिच्याकडे पैसेही मागितले. हा सर्व प्रकार तिनं आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like