‘सैराट’ रिपीट ! पळून गेलेल्या बहिणीचा अल्पवयीन ‘प्रिन्स’कडून गोळया झाडून खून

इंदोर : वृत्तसंस्था – देशभरात ऑनर किलिंगचे चालले सत्र अजूनही सुरूच आहे. मध्यप्रदेश राज्यातील इंदौर जवळ ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. बहिणीने खालच्या जातीतील मुलाशी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने चिडलेल्या सावत्र भावाने बहिणीवर गोळी झाडून तिची हत्या केली आहे.

इंदोर शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रावद गावात ही घटना घडली आहे. खून करणारा भाऊ हा अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावद गावातील बुलबुल या युवतीचे कुलदीप या युवकाशी प्रेमसंबंध होते. या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे याची माहिती गावातील लोकांबरोबर घरच्यांनाही होती. तिच्या घरच्यांनी कुलदीपला वारंवार धमकावलेही होते. बुलबुल ही श्रीमंत घरातील असून कुलदीप हा गरीब आणि खालच्या जातीतील होता. बुलबुलच्या घरच्यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. अखेर कुलदीप आणि बुलबुलने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विवाह केला आणि दुसऱ्या गावात ते राहू लागले. काही दिवसानंतर गावातील शांत झाल्यानंतर पुन्हा ते आपल्या गावी परतले. ही बातमी बुलबुलच्या घरी समजली. बुलबुलचा सावत्र भाऊ तिच्या घरी गेला आणि वाद घालू लागला. या वादातच त्याने गावठी पिस्तुलातून तिच्यावर गोळीबार केला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

कुलदीपच्या तक्रारीनुसार अल्पवयीन सावत्र भावाला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त