17 वर्षीय ‘निलांशी’नं बनवलं ‘या’ मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात येथील अरावली परिसरात राहणाऱ्या नीलांशी पटेलने नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. नीलांशीने केवळ 17 वर्षांची असताना देखील 190 सेमी केसांसोबत गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. या आधी देखील 2018 मध्ये तिच्या केसांची लांबी 170.5 सेमी होती. नीलांशी म्हणते की,ती जेव्हा जेव्हा बाहेर जाते तेव्हा लोक तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी येतात. आपल्या लांब केसांमुळे एखादे सेलिब्रेटी असल्यासारखे वाटत असल्याचे नीलांशी सांगते.

नीलांशीने सांगितले की, 2018 मध्ये सगळ्यात लांब केस असल्याचे रेकॉर्ड अर्जेंटीनाच्या ऐब्रिल लॉरेनजटीच्या नावावर होते. तिचे केसांची लांबी 152.5 सेमी इतकी होती. त्यानंतर हा विक्रम 17 वर्षांची किटो कवाहराने तोडला होता. तिच्या केसांची लांबी 155.5 सेमी इतकी होती. त्यानंतर आता निलांशीने हे सर्व विक्रम मोडत नवीन विक्रम केला आहे आणि गिनीज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like