‘वर्ल्ड ट्रेड सेंट’वरील दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण, आजही जखमा ताज्या

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

अल-कायदा दहशतवादी संघटनेने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या हल्ल्याला आज १७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, १७ वर्षानंतरही या हल्ल्याचे जखमा ताज्या असल्यासारखे जाणवत आहे. ९ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी हा सर्वात मोठा हल्ला करत अमेरिकेला लक्ष्य केले होते.

शाळकरी मुलींच्या सरंक्षणासाठी आजपासून रक्षा अभियान 

अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी विमाने हायजॅक करून त्यांचा वापर मिसाईल सारखा केला होता. यात वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागन बेचिराख करण्यात आले होते. व्हाईट हाऊसवरही हल्ला करण्याची या दहशतवाद्यांची योजना होती, मात्र ती यशस्वी झाली नाही. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात २ हजार ९७७ जणांना प्राण गमवावे लागले होते. तर पेंटागन येथील हल्ल्यात १८४ जणांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही हल्ल्यात एकूण ९० देशांतील नागरिकांनी आपला जीव गमविला होता. ९/११चा हल्ला म्हणून जगभरात या सर्वात भीषण हल्ल्याची नोंद झाली आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’868f4ae0-b5d1-11e8-9d0e-9fa95c2ee426′]

या हल्ल्यामुळे अमेरिका हदरून गेली होती. या हल्ल्यात १९ दहशतवाद्यांचा समावेश होता. १९ हल्लेखोरांपैकी १५ जण मूळचे सौदी अरेबियातील होते. विमानाचे अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांनी नॅव्हिगेशन सिस्टम बंद केली. यामुळे विमाने कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागत नव्हता. या चारही विमानात क्षमतेपेक्षा कमी प्रवाशी होते. अमेरिकन ११ या विमानात १५८ पैकी ८१ प्रवाशीच होते. तर युनायटेड १७५ मध्येदेखील १६८ पैकी ५६ प्रवासी होते. अमेरिकन ७७ मध्ये १७६ पैकी ५८ आणि युनायटेड ९३ मध्ये ३७ प्रवाशी होते. यावेळी प्रवाशांनी एअरक्राफ्ट रेडिओ कम्यूनिकेशन प्रणालीचा वापर केला. यामुळे अमेरिका प्रशासनाला विमानांचे अपहरण झाल्याचे समजले.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’973b7b44-b5d1-11e8-b827-b738ba9992fb’]

ओसामा बिन लादेन विमान अपहरण करून अमेरिकेत हल्ला घडविण्याचा कट करत आहे, असा इशारा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने १९९८ मध्येच दिला होता. पुढे त्याने हा कट अल-कायदाच्या माध्यमातू प्रत्यक्षात आणला. या मागे लादेन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर  त्या विरोधात अमेरिकेने कारवाई करण्यास सुरूवात केली. तब्बल ११ वर्षानंतर लादेनच्या मागावर असलेल्या अमेरिकेने अखेर त्याला शोधून काढले. त्याचा शोध घेत अमेरिका अफगाणिस्तानातून पाकिस्तानात पोहोचली होती. अबोटाबाद शहराला लागून असलेल्या एका इमारतीत लादेन पत्नी आणि कुटुंबासह राहत असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली. सील टीम नावाच्या अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानच्या जलालाबाद येथून पाकिस्तानात प्रवेश केला. या सैनिकांनी अवघ्या ४० मिनिटात लादेनचा खेळ खल्लास केला होता. पाकिस्तानातील अबोटाबाद येथे २ मे २०११ ला  पहाटे १ वाजताच्या सुमारास कंठस्नान घालण्यात आले होते.