अल्पवयीन मुलीवर अत्याचार : 17 वर्ष सक्तमजुरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीरामपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या शिवाजी विठ्ठल राख याला 17 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. श्रीरामपूर येथील सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आरोपी शिवाजी राख याने 3 जून 2017 रोजी पीडित मुलीस तिच्या मामाच्या घरून आईकडे नेवून सोडतो, असे सांगून घरी न सोडता गावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दुसर्‍या दिवशी तिला तिच्या आईकडे सोडले. झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली होती. मुलगी घाबरलेली होती, तसेच तिला तापही आला होता. त्यामुळे आईने मुलीची विचारपूस केली असता पीडित मुलीने सर्व हकीकत सांगितली.

याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पुण्याचा सकाळ तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एन. सलिम यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. बी. एल. तांबे व अ‍ॅड. पी. पी. गटणे यांनी महत्त्वाच्या लोकांच्या साक्षी नोंदवल्या. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एन. सलिम यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. बी. एल. तांबे व अ‍ॅड. पी. पी. गटणे यांनी महत्त्वाच्या लोकांच्या साक्षी नोंदवल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like