जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ फोटो ! पोलिसांनी घेरलेल्या अवस्थेत ‘ती’ वाचतेय ‘संविधान’

मॉस्को : वृत्तसंस्था – आपण पहात असलेला हा फोटो कदाचित जगातील सर्वात शक्तिशाली चित्रांपैकी एक आहे. हा फोटो रशियाची राजधानी मॉस्कोचा आहे. एक मुलगी गुडघ्यावर बसलेली आहे. तिच्या हातात रशियाचे संविधान आहे. तिच्यामागे मॉस्को पोलिस उभे आहेत. हा फोटो मॉस्कोमधील निषेधाचे सर्वात सामर्थ्यवान चित्र बनला आहे.

इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, २७ जुलै रोजी होत असलेल्या निषेधाच्या वेळी १७ वर्षीय ओल्गा मिशिक देशाच्या संविधानासह बसली होती. त्यांचे प्रदर्शन शांततेत सुरु आहे आणि ती शस्त्राला घाबरत नाही हे दाखविण्यासाठी तिने हे कृत्य केले. हा फोटो जगभरात व्हायरल होत आहे. लोक हा फोटो आवर्जून शेअर करीत आहेत आणि त्याबद्दल बोलत आहेत. चीनच्या तियान्मेन चौकात घडलेल्या घटनेवेळी एक व्यक्ती अशीच रणगाड्यासमोर उभी होती तो फोटो ही खूप गाजला होता, त्या फोटोशी या फोटोची तुलना होत आहे. भारतात देखील हा फोटो व्हायरल होत आहे.

टॅंकवरील फोटो काय होता ?

Tianmen
१९८९ साली जून महिन्यात तियान्मेन चौकात निषेध करणार्‍या विद्यार्थ्यांचे आंदोलन चीनच्या सरकारने चिरडून टाकले होते. टँकमनचे चित्र ५ जून १९८९ रोजी घेण्यात आले होते. हे चित्र त्याच काळातले होते जेव्हा चीनने मोठ्या प्रमाणात निषेध करणार्‍या लोकांना मारून टाकले. बीजिंगमध्ये जेव्हा सरकारकडून नरसंहार चालू होता, त्यावेळी रणगाड्यासमोर निर्भयपणे उभे राहिलेल्या व्यक्तीचे चित्र गाजले. पांढरा शर्ट घातलेला माणूस हातातल्या बॅगसह रणगाड्यासमोर निर्भयपणे उभा राहिला. २० व्या शतकातील हे सर्वात गाजलेले छायाचित्र होते.

आरोग्यविषयक वृत्त –