दरवर्षी पृथ्वीला धडकतात 17000 ‘उल्काश्म’, ‘या’ भागामध्ये जास्त धोका

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पृथ्वीवर दरवर्षी 17 हजारपेक्षा जास्त उल्काश्म आदळतात. यापैकी बहुतांश उल्का भूमध्य रेषेच्या जवळच्या प्रदेशात पडतात. याबाबतचा खुलासा एका शास्त्रज्ञाने केला, जेव्हा तो अंटार्कटिकामध्ये संशोधन करत होता. ते स्नोमोबाइलमधून अंटार्कटिका मध्ये फिरत असताना त्यांना उल्काश्म सापडले.

जियोफ्री ईवाट इंग्लडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमध्ये अ‍ॅप्लाइड मॅथमेटेशियन आहेत. अंटार्कटिकेच्या दौर्‍यानंतर ते आणि त्यांचे सहकारी या गोष्टीचा शोध घेऊ लागले की प्रत्येक वर्षी पृथ्वीवर किती उल्काश्म पडतात. सर्वात जास्त उल्काश्म कुठे पडतात.

जियोफ्री सांगतात की, एप्रिल 1988 ते मार्च 2020 पर्यंत पृथ्वीवर किती उल्काश्म पडले आणि त्यांची किती ठिकाणी नोंद करण्यात आली आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि नासाद्वारे बनवण्यात आलेल्या नकाशात सांगण्यात आले आहे की, पृथ्वीवर सर्वात जास्त उल्का वर्षाव झाला आहे.

या लोकांनी पृथ्वीच्या काही भागांची निवड केली आणि नंतर दोन वर्ष अभ्यास केला. या अभ्यासाठी जास्त उपयुक्त वेळ उन्हाळ्याची होती. यासाठी उन्हाळ्यात धरतीच्या विविध भागात ते उल्काश्मांच्या कोसळण्याचा अभ्यास करत होते.

यावर्षी 29 एप्रिलला जियोलॉजी मॅगझीनमध्ये ईवाट यांनी आपला अहवाल प्रकाशित केला आहे. यात म्हटले आहे की, पृथ्वीवर प्रत्येक वर्षी 17 हजारपेक्षा जास्त उल्काश्म पडतात. सर्वात जास्त उल्काश्म भूमध्य रेषेच्या जवळच्या प्रदेशांमध्ये पडतात.

जियोफ्री ईवाट म्हणतात, खरोखरच तुम्हाला उल्का पडतानाचा झगमगाट पहायचा असेल तर तुम्हाला भुमध्य रेषेच्या जवळच्या परिसरात जाऊन रात्र घालवावी लागेल.

ईवाट म्हणतात, अंटार्कटिकामध्ये उल्काश्मांची मोजदाद करणे अन्य ठिकाणांपेक्षा सोपे आहे. परंतु, सर्वात मोठी अडचण ही आहे की, जर उल्काश्म बर्फाच्या आत गेल्यास तो शोधणे आवघड होऊन जाते. बर्फसुद्धा विरघळून समुद्रात वाहून जातो.

पृथ्वीच्या चारी बाजूला होणारा उल्कांचा वर्षाव सर्वात जास्त भूमध्य रेषेच्या जवळ होतो. येथे त्यांच्या पडण्याची तीव्रता आणि संख्या जास्त असते. अनेक तर महासागरात पडतात, त्यामुळे त्यांची मोजदाद करणे अवघड असते. परंतु, जगभरातील दुर्बिणींमध्ये त्यांचे छायाचित्र येते.

जियोफ्री म्हणतात, नॉर्वे सारख्या भागात सुद्धा तुम्हाला उल्कांचा पाऊस उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो. सोबतच तेथे नॉर्दन लाइट्सचे सुंदर दृश्य पाहण्यास मिळू शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like