Coronavirus : मुंबईत 24 तासात 1751 नवे ‘कोरोना’चे रुग्ण तर 27 जणांचा बळी, बाधितांची संख्या 27000 पार

मुबंई :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1751 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27068 इतकी झाली आहे.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 27 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 909 झाली आहे. मुंबईत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 23264 रुग्णांवर कोविड-19 हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 7080 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांचा आज नवा उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 2940 नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील संकट आणखी गडद झालं आहे. गेल्या 24 तासात कोरोनाने 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत तर 857 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यातील कोरनाबाधित रुग्णांची संख्या 44 हजार 582 एवढी झाली असून त्यापैकी 30474 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.