18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

नवी दिल्ली : 18 Carat Gold | सोने आजही सणासुदीला मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. परंतु या खरेदीपूवी काही महत्वाच्या गोष्टी आजे ज्या प्रत्येक ग्राहकाला माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही धनत्रयोदशी किंवा दिवाळीला सोने खरेदीचा विचार करत असाल तर, या महत्वाच्या गोष्टी (18 Carat Gold) आवश्य जाणून घ्या…

सोन्याची शुद्धता :

शुद्धतेच्या हिशेबाने सर्वात चमकदार 24 कॅरेट सोने असते. यामध्ये 99.9 टक्के सोने असते. 22 कॅरेटमध्ये 91.6 टक्के, 18 कॅरेटमध्ये 75 टक्के आणि 14 कॅरेटमध्ये 58.5 टक्के सोने असते.

कोणत्या गोष्टीसाठी कोणते सोने चांगले? :

– 24 कॅरेट सोने नाणे आणि बार (बिस्किट) बनवण्यासाठी वापरतात. तसेच काही इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल डिव्हाईसमध्ये सुद्धा वापरले जाते.

– 22 कॅरेट सोने सामान्यपणे दागिने बनवण्यासाठी वापरतात.

– 18 कॅरेट सोने स्टोन (18 Carat Gold) स्टडेड (खडे/रत्नसंबंधी ज्वेलरी) किंवा इतर डायमंडसंबंधी दागिने बनवण्यासाठी वापरले जाते.

– रोजच्या वापरासाठी 22 कॅरेट सोने घ्यावे, यात 91.6 टक्के सोने, आणि सिल्व्हर, कॉपर आणि झिंक सुद्धा असते. या मेटल अलॉईजमुळे दागिन्यांना मजबूती येते.

हॉलमार्क ज्वेलरीच घ्या :

हॉलमार्क असलेले दागिनेच घ्या. यामुळे शुद्धतेबाबत चिंता राहात नाही.

वजन क्रॉस चेक करून घ्या :

सोने खुप महाग असते. म्हणून सोन्याचे वजन चेक करा बिलद्वारे ते चेक करा. इतर ठिकाणी वजन करण्याचा प्रयत्न करा.

मेकिंग चार्ज आणि बिल :

दुकानदार मेकिंग चार्ज धातूनुसार 10 ते 35 टक्के घेतात. मात्र, दुकानदाराने यावर सवलत दिली तर दागिन्याची किंमत कमी होऊन तुमचा फायदा होऊ शकतो. सणानिमित्त अशी ऑफर (18 Carat Gold) असेल तर तिचा लाभ घ्या.

हे देखील वाचा

EPFO Alert | पीएफ मध्ये आलेले व्याजाचे पैसे होतील गायब, चुकूनही शेयर करू नका ‘हा’ नंबर; जाणून घ्या

Life Certificate | नियमीत पेन्शन मिळण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी जमा करा लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Mumbai Drug Case | वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला गोप्यस्फोट; जाणून घ्या पत्रात?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : 18 Carat Gold | 18 carat gold has only 75 purity know which is best and what should you keep in-mind while buying

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update