बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात कोम्बिंग ऑपरेशन ; १८ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील बुधवार पेठेतील  रेड लाईट परिसरात परिमंडल १ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून १८ तरुणींची सुटका केली आहे. तरुणींकडून देहविक्रय करून घेत ५० टक्के रक्कम स्वत: घेत असल्याप्रकरणी ९ घरमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जहाना मोहंमद रजा शेख( रा.माचीस बिल्डींग, बुधवार पेठ), रुपा अब्दुलखान( रा.माचीस बिल्डींग, बुधवार पेठ),मैली टिकातमांग(रा.मर्गीगल्ली, बुधवार पेठ), तारा बकतल तमांग (बेलकम बिल्डींग, बुधवार पेठ), शिमला साथमन तमांग( बेलकम बिल्डींग, बुधवार पेठ), यास्मीन मोबीन शेख( बेलकम बिल्डींग , बुधवार पेठ), मुख्‌तार शेख ( कोहिनूर बिल्डींग, बुधवार पेठ), काज गोरे तमांग (बुधवार पेठ), गंगुबाई कांबळे (बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरातील घरात तरुणींना ड़ांबून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती परिमंडल १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली होती. परिमंडल १ च्या १५ पोलीस अधिकारी व ७० कर्मचाऱ्य़ांच्या पथकाने  बुधवार पेठ व शुक्रवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवविले. त्यावेळी १८ तरुणींची सुटका करण्यात आली तर  त्यांच्या मर्जीविरोधात त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या ९ घरमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर न्यायालयाच्या आदेशाने या १८ तरुणींना हडपसर येथील रेस्क्यू होममध्ये पाठविण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कारवाईत परिमंडल १ चे १५ पोलीस अधिकारी व ७० कर्मचाऱ्य़ांनी सहभाग घेतला.