Coronavirus : आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख लोकांना लसीकरण; गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात गेल्या शनिवारी (दि. 16) पासून जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. 17) देशभरात 17 हजार लोकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे. दरम्यान देशात अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशात 13,788 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,05,71,773 झाली आहे. तर 14,457 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. देशातील एकूण आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,02,11,342 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण मृतांची संख्या ही 1,52,419 वर पोहोचली आहे. सध्या देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 2,08,012 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशभरात गेल्या 24 तासांत 5,48,168 चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,70,93,036 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती ही इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research ) दिली आहे. रविवारी राज्यात 3081 नवे रुग्ण सापडले असून या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 19,90,759 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 2342 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,86,469 वर जाऊन पोहोचली. रविवारी राज्यात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 50,738 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 52,653 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.