18 वर्षाचे झालात तर करा ‘हे’ काम, मोदी सरकारच्या ‘या’ स्कीमव्दारे मिळतील घरबसल्या दरमहा 5 हजार रूपये, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचं वय 18 वर्षे असेल आणि तुम्ही जर भविष्यासाठी काही प्लॅनिंग केलेलं नसेल तर तुमच्यासाठी खास संधी आहे. आज आपण एका सरकारी स्किमबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यात काही नाममात्र योगदान देऊन 60 व्या वर्षानंतर आयुष्यभर 5 हजार रुपये प्रतिमहिना किंवा वर्षाला 60 हजार रुपये लाभ मिळवू शकता.
कमी कमावणाऱ्या लोकांसाठी अटल पेंशन योजना ही मोदी सरकारची प्रसिद्ध पेंशन स्किम आहे. जी निश्चित इनकमी गॅरंटी देते. 18 वर्षीय कोणताही नागरिक या स्किमचा लाभ घेऊ शकतो. या स्किम अंतर्गत एक खातं उघडणं गरजेचं असतं. यात मंथली, तिमाही आणि सहामाहीची सुविधा आहे. यात महिना 5 हजार रुपये किंवा वार्षिक 60 रुपये मिळण्याची खात्री आहे.
कसे मिळणार महिना 5 हजार
तुम्हाला या स्किमअंतर्गत महिना 210 रुपये जमा करावा लागेल. वर्षाच्या हिशोबानं विचार केला तर 2520 रुपये तुम्हाला वार्षिक भरणा करावा लागतो. वयाच्या 60 वर्षांपर्यंत तुम्हाला मंथली 210 रुपये भरावे लागतील. 60 व्या वर्षानंतर तुम्हाला प्रति महिना 5 हजार रुपये खात्यावर येण्यास सुरुवात होईल. जे वर्षाला 60 हजार रुपये असतील.
तिमाही प्लॅन – यामध्ये तुम्हाला प्रत्येक 3 महिने 626 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या 42 वर्षांपर्यंत तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. यावेळी तुमची गुंतवणूक 1.05 लाख रुपये होईल. याबदल्यात 60 वर्षानंतर तुम्हाला आयुष्यभर 5 हजार रुपये प्रतिमहिना मिळत राहतील.
सहामाही प्लॅन – यात तुम्हाला 6 महिन्यात 1239 रुपये गुंतवावे लागतात. 42वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करायची आहे. यात तुमची गुंतवणूक 1.04 लाख असेल. याबदल्यात 60 वर्षांनंतर तुम्हाला आयुष्यभर 5 हजार रुपये प्रतिमहिना मिळेल.
कमी वय असल्यास योजनेचा ज्यादा फायदा
जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेला जुडलात तर तुमची एकूण गुंतवणूक 1.05 लाख रुपये होईल. जर तुम्ही 35 वर्षी या योजनेत प्रवेश केला तर तिमाही प्लॅनसाठी तुम्हाला प्रत्येक तीन महिन्याला 2688 रुपये जमा करावे लागतील. यात तुम्हाला 25 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. यानुसार तुमची एकूण 2.68 लाखांची गुंतवणूक होईल. एकसारख्या पेंशन प्लॅनसाठई तुम्हाला जवळपास 1.63 लाख अतिरीक्त जमा करावे लागतील.
योजनेचे इतर फायदे-
– ही योजना पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण नॅशनल पेन्शन योजनेमार्फत चालविली जात आहे.
– आयटी सेक्शन 80CCD नुसार टॅक्स सूटही मिळणार आहे.
– एका सदस्याच्या नावानं एकच खातं उघडलं जाऊ शकतं.
– अनेक बँकेत खातं उघडण्याची सुविधा
– योगदानाची रक्कमही पहिल्या 5 वर्षात सरकारकडून दिली जाईल.
– हे 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 च्या 50 टक्क्यांहून अधिक असणार नाही.
– जर 60 वर्षांपूर्वी सदस्याचा मृत्यू झाला तर पेंशनची रक्कम त्याच्या पत्नीला मिळेल.
– जर सदस्य आणि पत्नी असा दोघांचाही मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेंशन देतं.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- सततच्या पाठदुखीच्या त्रासाकडे करु नका दुर्लक्ष, करा ‘हे’ ५ उपाय !
- ‘या’ १० गोष्टी देतील तुम्हाला दीर्घायुष्य, जाणून घ्या
- ‘हे’ आसन केल्यास रहाल चिरतरुण ! जाणून घ्या ७ फायदे
- ‘या’ योगासनाने पोटावरील चरबी होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे
- सतत ‘एसी-कुलर’ची हवा खाल्ल्याने होतील ‘हे’ ४ दुष्परिणाम
- घरातील झुरळ पळवण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- जेवताना पाणी पिता ? ‘या’ ४ गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा पडू शकते महागात