Coronavirus : 18 % रूग्ण स्वतःच्या घरातच होताहेत पॉझिटिव्ह, भाजीपाला अन् किराणा सामान खरेदीच्या वेळी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : अमेरिकेच्या फ्लोरिडा युनिव्हर्सिटीत झालेल्या रिसर्चनुसार कोरोनाचे 18% रूग्ण आपल्या घरातील सदस्यांना संक्रमित करत आहेत. अशावेळी अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने एक गाईडलाईन जारी केली आहे. तिचे पालन करून तुम्ही कोरोना काळात घरातून बाहेर जाणे, खरेदी करण्याच्या दरम्यान स्वत:ला आणि आपल्या कुटुंबांचा वाचवू शकता. कोण-कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात…

1. होम डिलिव्हरीच्या वेळी काय करावे

कोरोना संकटामुळे जर तुम्ही घरात आहात आणि होम डिलिव्हरीने तुमचे सामान येत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून तुमचे कुटुंब संक्रमित होणार नाही. डिलिव्हरी बॉयने जर मास्क घातला नसेल तर सामान घेणे टाळा. सामानाची डिलिव्हरी घेतल्यानंतर सर्वप्रथम कार्डबोर्ड किंवा प्लास्टिक पॅकेजिंग फाडून टाका. सॅनेटाइज केल्यानंतर सामान बाहेर काढा आणि नंतर सामान काही तासासाठी ठेवून द्या. त्यानंतर पुन्हा एकदा हात सॅनिटाइज करा.

2. दुकानात जाऊन कशी करावी शॉपिंग
सामानाची यादी बनवा, जेणेकरून जास्तवेळ दुकानात थांबावे लागणार नाही. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसह ग्लव्हज घाला. बिलिंगनंतर ऑनलाइन पेमेंट करा. कार्ड पेमेंट आणि कॅश टाळा. गर्दी नसलेले दुकान निवडा.

3. भाजी-फळे असे खरेदी करा
जर भाजी किंवा फळे विक्रेता दरवाजावर येत असेल तर ज्यामध्ये भाजी घ्यायची आहे ते भांडे दूर ठेवा. भाजी स्वता घेण्याऐवजी भाजीवाल्याला सांगा तुम्हाला कोणती भाजी हवी. मास्क घाला. भाजी-फळे पाण्याने चांगले धुवून घ्या. भाजी-फळे सॅनिटाइज करू नका. अतिशय आवश्यक सामान सोडून इतर गोष्टींची खरेदी टाळा.

4. होम सर्व्हिसमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा
घरात प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा इंजिनियर आल्यास त्याच्यापासून अंतर ठेवा. घरात आजारी व्यक्ती असेल तर त्यास संपर्कात येऊ देऊ नका. काम लवकर संपवा. घरातील रेस्ट-रूमचा वापर सर्वांना करू देऊ नका. स्वता मास्क घाला आणि सर्वांना घालू द्या.

5. हॉस्पिटलमध्ये गेल्यास काय करावे
जर हॉस्पिटलमध्ये जावे लागले तर सर्वप्रथम डॉक्टरांशी ऑनलाइन, फोनवर किंवा ई-मेलवर अपॉयमेंट घ्या. क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये योग्य प्रकारे मास्क लावा. तेथील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करू नका. पब्लिक वॉश-रूम किंवा हॉस्पिटलच्या वॉश-रूमचा वापर करू नका.

6. कोणत्या वस्तूवर किती दिवस राहतो व्हायरस

* प्लास्टिक – 3 ते 7 दिवस
* कार्डबोर्ड – 24 तासापर्यंत
* बाटलीत – 4 दिवस
* कपड्यांवर – सुमारे 3 दिवस

7. कसे कराल पेमेंट

पेमेंट करताना शक्यतो ऑनलाइन पमेंट करा. कॅशचा व्यवहार टाळा. कॅश व्यवहार करत असाल तर पैसे ग्लव्हज घातलेल्या हाताने द्या किंवा घ्या.