परभणीत सामूहिक नमाज पठण, 18 जणांविरुद्ध FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आले आहे. मात्र, तरीही परभणीतील सेलू शहरातील फुले नगरातील ख्वॉजा खान पठाण यांच्या घरात सामूहिक नमाज पठण केल्याप्रकरणी सेलू पोलिसात 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुले नगरातील घरात सामूहिक रीत्या नमाज पठण करण्यासाठी अनेक जण एकत्र आले होते. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या फिर्यादीवरून घरमालकासह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लॉकडाउनमध्येही अनेकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे कोरोनाचा वेग वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकीय स्तरावर केलेल्या उपाययोजना पायदळी तुडविल्या जात आहेत.