केरळमध्ये मुसळधार पाऊस; १८ मृत्युमुखी 

तिरुवन अनंतपुरमः वृत्तसंसथा
केरळमध्ये आज (गुरुवार) सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, ठिकठिकाणी भूस्खलन झाले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. दिलेल्या माहिती नुसार जोरदार पावसामुळे व भुस्खलनामुळे इडुक्की येथील आदीमाली शहरात दरड कोसळली. त्यात एकूण  १० जणांचा मुत्यू झाला. त्यातील एका कुटुंबातले  पाचजण होते.  मलाप्पुरम येथे ५, कन्नूर येथे २ व वायानाद जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक जनता आणि पोलिसांनी दोघांना जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. तिघेजणांचा शोध सुरु आहे. वायनाड, पलक्कड आणि कोझीकोडे जिल्ह्यातील आहेत.

वायनाड आणि कोझीकोडे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. घटनास्थळी बचाव दलाचे पथक व पोलिस दाखल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडा भरून वाहू लागल्या आहेत, प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. एनडीआरएफची टीम कोझीकोडेला रवाना झाली आहे. इडुक्कीमध्ये शैक्षणिक संस्थांना कामकाज बंद  करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

[amazon_link asins=’B07D1RC6KQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1faeded0-9bc0-11e8-b35e-afbbdef6485d’]