राज्य पोलिस दलातील सर्वात मोठी कारवाई ; १८ पोलिस निलंबित

चंद्रपुर : पोलीसनामा ऑनलाईन – कामात चुका आणि कामचुकारपणा करणाऱ्या १८ पोलिसांना आज निलंबित करण्यात आले. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या पोलिसांवर कारवाई करुन निलंबित केले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कामचुकारपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दिवाळीपूर्वीच पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईमुळे चंद्रपुरात चर्चेला उधाण आले आहे.

चंद्रपूर पोलीस दलात काम करणाऱ्या कामचुकार पोलिसांमुळे पोलिसांची प्रतिमा मिलीन होत आहे. कामचुकारपणा आणि कामामध्ये चुका करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर कामचुकार करणाऱ्या पोलिसांना निलंबीत केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांना त्यांचा कामचुकारपणा आणि कामातील चुका भोवला असल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात आहे. मात्र, अधीक्षकांच्या या कारवाईचा धसका इतर पोलिसांनी घेतला आहे. राज्यातील एकदाच १८ पोलीस कर्मचाऱ्याना निलंबित करण्याची ही पहिलीच घटना आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून असणाऱ्या महेश्वर रेड्डी यांनी ही कारवाई केल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये देखील निलंबनाबाबतची चर्चा सुरु आहे.

जाहिरात