धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्ड ड्रिंक्स मधून गुंगीचे औषध देऊन १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादाय़क प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी बलात्कार करणाऱ्या तरूणाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत तरुणी ही विक्रोळी भागात राहण्यास आहे. तिची बहिण नायगाव भागात राहते. दरम्यान २२ मे रोजी तिच्या बहिणीने तिला नायगाव येथे भेटण्यासाठी बोलवले होते. त्यावेळी नायगाव येथील रिक्षा स्टॅंडजववळ एक अबलोन नावाचा तरुण तिला घेण्यास येईल असे तिने सांगितले. दुपारी १ च्या सुमारास नायगाव रेल्वे स्टेशनवर २० ते २५ वयोगटातील तरुण अबलोन तेथे तिला घेण्यास आला. तिला त्याने विचारण्या केल्यावर तिची बहिण बीचवर असल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर त्याने गाडीत बसवून बीचकडे नेताना तिला कोल्डड्रींकमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर बेशुध्दावस्थेत बलात्कार केला. तरुणीने शुक्रवारी वालीव पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.